महाराष्ट्र वेदभुमी

शिक्षण संस्था बंद पडून कायमस्वरूपी सुटी मिळावी अल्पवयीन मुलाने विजेचा शॉक देऊन खून केल्याची धक्कादायक घटना

कोल्हापुर :- शिक्षण संस्था बंद पडून कायमस्वरूपी सुटी मिळून घरी जायला मिळावे, या हेतूने एका अल्पवयीन मुलाने संस्थेतीलच झोपलेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याचा विजेचा शॉक देऊन खून केल्याची धक्कादायक घटना आज पोलिस चौकशीत उघड झाली.

हा प्रकार आळते (ता.हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण संस्थेत घडला. मृत मुलाचे नाव फैजान नाजिमा (रा. गमहरीया पंचायत, अचल जोकहाट बग्दहरा आरविया, बिहार. सध्या रा. आळते) असे आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याच्या सहकारी अल्पवयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली...

आळते (ता. हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण देणाऱ्या निवासी संस्थेमध्ये ८० विद्यार्थी असून, यापैकी ७० विद्यार्थी बिहारमधील आहेत. सोमवारी (ता.१६) पहाटे पाच वाजण्यापूर्वी अल्पवयीन विद्यार्थी फैजान नाजिमा याचा झोपलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाला होता. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व उपअधीक्षक रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली...

हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले. त्यानुसार त्याच शैक्षणिक संस्थेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने, फैजान नाजिमाला झोपेतच असताना इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन खून केल्याचे कबूल केले...

शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद पडून घरी जायला मिळेल, या हेतून अल्पवयीन संशयित विद्यार्थ्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, त्यामध्ये मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी खुनाचा उलगडा केला...

Post a Comment

Previous Post Next Post