कोलाड (श्याम लोखंडे ) मंगळवारी 10 जून रोजी रोहा तालुक्यात पावसाच्या विश्रांतीत सावित्रींनी एकटवत साधला पूजेजा योग तालुक्यात ठीकठिकाणी वट पौर्णिमा वट वृक्षाची पूजा करत सौभाग्यवती महिलांनी केली भक्तिमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी...सोमवारी 9 जून रोजी वट पौर्णिमासाठी महिलांनी बाजारात दाखल होत पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी केली.तर मंगळवारी वट पारावर पूजेसाठी असंख्य सुहासिनी महिलांनी एकत्रित येऊन या वृक्षाची मनोभावे पूजन केले...
रोहा तालुक्यात शहरी भागासह तालुक्यातील कोलाड, खांब,किल्ला,देवकान्हे, अशा ग्रामीण भागातही वटपौर्णिमा व्रत उत्साही वातावरणात पार पडला...जांभळ, करवंद, फणसाचे गरे, करंडा फनी, आळू , पानाचा विडा,नारळ,आदि द्रोणामध्ये ठेवून वडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करून फळांचे द्रोण, हळदी कुंकू वान देत महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली...
वटपौर्णिमा लागणारे करंडाफणी व जांभळ, करवंद, फणसगरे, आदींचे पानावरील वाटे आदिवासी महिला विक्रीसाठी घेऊन बसतात त्यामुळे सहज उपलब्ध होते...पण फणस,आलू, करवंद,जांभळे, अवकाळी पावसामुळे मात्र किंमत विक्रीत अधिक वाढ होती... पावसाची विश्रांती मिळताच सावित्रीनी वट वृक्षांचा पारावर जाऊन भक्ती भावनेने पूजा करत पतीसह परिवारातील सर्वांना सुखी ठेव अशी मनभावे प्रार्थना केली...
