महाराष्ट्र वेदभुमी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ३० जूनला


कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

मुंबई, दि.२८ : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा गुरुवारी विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत करण्यात आली...

विधानभवनात आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीला विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,  उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार,  मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्यासह  मंत्री ,आमदार आणि संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते !

बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली...

 सदर बैठकीत राज्य विधीमंडळाच्या कार्यक्षमतेसाठी आणि प्रभावी कामकाजासाठी महत्वपूर्ण निर्णयांवर सकारात्मक चर्चा पार पडली...

Post a Comment

Previous Post Next Post