महाराष्ट्र वेदभुमी

संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी वारकरी 'बालसुसंस्कार शिबीर'

शिबिरात घेतला ७० मुलाचा सहभाग

रामटेकः  स्वानंद सुखनिवासी सदगुरु जोग महाराज संस्थापीत वारकरी शिक्षण संस्था आळंदी द्वारा घनशामराव किंमतकर सभागृह येथे २५ ते ३१ मे पर्यंत ८ दिवसीय निवासी शिबिर आयोजीत केले होते. ३१ मे ला रामटेक शहरात सकाळी दिंडी यात्रा काढण्यात आली. वारकरी शिक्षण संस्था चे अध्यक्ष ज्ञानसिंधू संदिपान जी महाराज शिंदे हासेगांवकर आळंदी यांचे गोपालकाल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ झाले व शिबिराच्या समारोप झाला. शिबिरात ७० विद्यार्थांना योगासने, स्तोत्र पठन,टाळ वादन, भजन गायन, मृदंग वादन, व्यसनमुक्ती, विष्णुसहस्त्रनामाचा पाठ, हरिपाठ पाऊली, हनुमान चालीसा पठन, भगवदगीता पठन, श्लोक, अभंग गायन, आध्यात्मिक चर्चासत्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी वारकरी शिक्षण संस्था सचिव गुरुवर्य बाजीराव महाराज चंदिले, विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज काळे. ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक. ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, उपस्थित होते. ज्ञानसिंधू संदिपानजी महाराज, महाराष्ट्रभूषण रामायणाचार्य रामरावज ढोक यांच्या मार्गदर्शन मध्ये प्रमोद ठाकरे, सदानंद हेलंडे, हनुमान गोणारकर, परमेशवर मांडगवडे, शुभम वानखेडे, राजू दराडे, प्रशांत नासरे यानी प्रशिक्षण दिले. कार्यक्रम शिविर यशस्वीतेकरीला देवचंद हटवार, ऋषिकेश किंमतकर, स्वप्नील लेंडे, उमेश हटवार, दुर्गेश महाजन, सुमित कोठारी प्रल्हाद किंमतकर, रामभाऊ पडोळे, डॉ रामचंद्र जोशी यांनी प्रयत्न केले...

Post a Comment

Previous Post Next Post