महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामीण भागातील विद्यार्थी होणार स्पर्धेसाठी तयार..!

 


माणगाव प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी खा. श्री. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माणगाव येथील एस.एस. निकम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे "फाउंडेशन कोर्स" सुरू करण्यात येत आहे... त्यासंबंधी आज वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी प्रतिष्ठान यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला... यावेळी मंत्री आदिती तटकरे, खा. श्री. सुनिल तटकरे उपस्थित होते...

याअंतर्गत एस.एस.निकम इंग्लिश मिडीयम शाळेच्या आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना IIT आणि NIT मधील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे... या उपक्रमाचा संपूर्ण शैक्षणिक भार वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट उचलणार असून, रोटरी इंग्लिश स्कूल शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी घेणार आहे...

दिनांक १६ जून २०२५ पासून पुढील ५ वर्षांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उत्तम व्यासपीठ मिळावे, तसेच उत्तम प्रतीचे शिक्षण मिळावे हाच प्रयत्न आहे...

यावेळी डॉ. मदन निकम, श्री. बिपिन पाटणे, श्री. पराग चिखले, डॉ. संगीता कोकाटे, श्री. विजय पाईकराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post