महाराष्ट्र वेदभुमी

राज ठाकरे यांचा भाव वाढला; भाजपा मनसे युती होणार. देवेंद्र फडणीस यांनी गेम फिरवला.


मुंबई प्रतिनिधी दि.१५  : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय घडामोडींना चांगलीच गती मिळाली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे  आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  पुन्हा एकत्र येणार युती होणार  अश्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. सर्वत्र याबाबत चर्चा होत आहे...

त्यातच राज्याचे चाणक्य नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी वांद्र्यातील 'ताज' हॉटेलमध्ये भेट झाली. हि भेट गुप्त होती. या भेटीनंतर, मनसे-शिवसेना युतीला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? ही सर्व माहिती गुलदस्त्यातच आहे. पण भाजप मनसे युती होणार हे जवळ पास निश्चित झाले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post