उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ): पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरद्वारे जशास तसे उत्तर देऊन धूळ चारली...या ऑपरेशन दरम्यान भारतीय सैनिक संदीप गायकर यांना वीरमरण आले... देशासाठी ते शहीद झाले... त्यांना विविध क्षेत्रातून, विविध स्तरावर भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली... उरणमधील सारडे गावचे सुपुत्र कुणाल रामचंद्र पाटील यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या देशासाठी शहिद होणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी पेन, पेन्सिल, कोळसा या साहित्याचा वापर करून देशासाठी शहीद झालेले संदीप गायकर यांचे चित्र कागदावर रेखाटले...चित्र रेखाटून त्यांनी शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे... कुणाल पाटील हे एका कंपनीत काम करीत असून चित्रकलेची त्यांना आवड आहे... पेन, पेन्सिल, कोळसाचा वापर करून त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रे रेखाटली आहेत...