सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : गावातील लोकांना शेती आधारीत जोड व्यवसाय म्हणून नुकतेच पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी येथील अमलतास येथे पक्षी पालन बाबद प्रशिक्षण कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते... वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरीक उपस्थित होते... पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ किशोर मानकर याच्या पुढाकाराने व त्यांच्या कल्पकतेतून अमलतास सिल्लारी या ठिकाणी बफर गावातील लोकांना शेती आधारित जोड व्यवसाय बद्दल पक्षी पालन बाबत प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते...
यावेळी डॉ पवन शिंदे पशुधन विकास अधिकारी बदक पैदास केंद्र वडसा यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले... यावेळी सरपंच पिपरिया प्रवीण उईके व वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी ए.नि जयेश तायडे हे प्रमुख्याने हजर होते... यावेळी वाघोली, पिपरिया, खापा, तुयापार, घोटी, सालई, सिल्लारी या गावातील नागरिक हजर होते... पेंच प्रतिष्ठान अंतर्गत सदर उपजीविका योजना राबविण्यात येणार आहे...
