पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील मनसर-कांद्री चेक पोस्ट नाक्यावर रविवार रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान भरधाव जाणाऱ्या पिकअप व्हॅनने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संतोष खंडाते (रा. लाखापूर ता.रामटेक) असे मृताचे नाव आहे. तर पिकअप चालक घटनास्थळावरून पळून गेला. प्राप्त माहितीनुसार खनोरा ग्रामपंचायतीच्या लाखापूर येथील रहिवासी संतोष खंडाते हे आठवडी बाजारात समोसा भज्याच्या दुकानात काम करायचे. रविवारी रात्री १०.३० वाजता तो दुकान बंद करून घरी जात होता. दरम्यान, पिकअप चालकाने संतोष खंडाते यांना जोरदार धडक दिली आणि चेकपोस्टचा परिसरात लावण्यात आलेल्या बेरीगेटला तोडून तो पळून गेला. घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी टीम व रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी पिकअप चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे...
