सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- वनपरीक्षेत्र हद्दीत येणाऱ्या बोरडा सराखा येथील शेतात बांधलेल्या गायीवर वाघाने हल्ला करून गाईच्या नरडीचा घोट घेऊन तिला ठार केले आहे... ही घटना दि. १९ मे रोजी मध्यरात्री घडल्याची प्राथमिक माहिती आहे... प्राप्त माहितीनुसार, बोरडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सराखा येथील रहिवासी परशुराम चैतराम तोंडरे वय ३३ वर्षे... यांची सराखा शिवारात शेती असून ते व्यवसायाने पशुपालक आहेत... नेहमीप्रमाणे जनावरे शेतात बांधून घरी गेले... सकाळी येऊन पहिले असता खुटाला बांधलेली गाय मृत अवस्थेत दिसून आली... पशुपालकाने याची माहिती गावचे उपसरपंच पंकज चौधरी यांना दिली... त्यांनी घटनेची माहिती रामटेक वनविभागाला दिली... क्षेत्र सहाय्यक एम.एल.गोंडीमेश्राम, वनमजूर रामू कोकोडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला... पुढील तपास वनविभाग करीत असून पशुपालकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली आहे...