सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नुकत्याच पंचायत समिती रामटेक अंतर्गत ग्रामपंचायत भिलेवाडा येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. उपक्रमाचा उद्देश जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करून सेंद्रिय खतनिर्मिती करणे आणि दीर्घकालीन स्वच्छता सुनिश्चित करणे असा असल्याचे बिडीओ जयसिंग जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद नागपूर येथून डॉ. कविता मोरे मॅडम (पशुसंवर्धन अधिकारी), रामटेक पं.स. बिडीओ जयसिंग जाधव यांचेसह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तथा नागरीक उपस्थित होते. ग्रामपंचायत पातळीवर संपूर्ण गावात जनजागृती करण्यात आली असून, नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला असल्याचेही जाधव यांनी माहिती देतांना सांगितले. कार्यक्रमास जिल्हा परिषद नागपूर येथून डॉ. कविता मोरे मॅडम (पशुसंवर्धन अधिकारी), मा. श्री. जयसिंग जाधव (गट विकास अधिकारी), श्री. मारोती भुजाडे (सहाय्यक गट विकास अधिकारी), श्री. निमदेव चव्हाण (पशुधन विकास अधिकारी - विस्तार), श्रीमती चैताली देशमुख (जिल्हा सल्लागार, जि. प. नागपूर), श्री. राजू कोल्हे (विस्तार अधिकारी - पंचायत), श्री. राजेश जगने (विस्तार अधिकारी - संख्यकीय), तसेच ग्रामपंचायत भिलेवाडा येथील सरपंच सौ. उमा ढोक, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सागर कांबळे, गट समन्वयक श्री. राजीव मडामे, समूह समन्वयक श्री. महेंद्र बुरले व सौ. संजीवनी घारपांडे, ऑपरेटर कु. अबोली लांजेवार, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
“स्वच्छ व आरोग्यदायी गाव"
सेंद्रीय खतनिर्मीतीसाठी ठरणार उपयोगी मोहिमेच्या कालावधीत भिलेवाडा ग्रामपंचायतीत बांधण्यात आलेले कंपोस्ट खड्डे तांत्रिकदृष्ट्या भरून त्यांचा प्रभावी उपयोग सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करून “स्वच्छ व आरोग्यदायी गाव” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. तालुकास्तरावर या उपक्रमाचे अनुकरण करून इतर ग्रामपंचायतींनाही १० मे २०२५ पर्यंत खड्डे भरून योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन याप्रसंगी डॉ. कविता मोरे व बिडीओ जयसिंग जाधव यांचेतर्फे करण्यात आले...
