सचिन चौरसिया रामटेक
रामटेक :- कार्यशाळेत गटांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक निविष्ठा एकत्रित खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होणार असल्याचे सांगण्यात आले... अशी माहिती स्थानीक पंचायत समिती तालुकास्तरीय खरिप हंगामपुर्व शेतकरी कार्यशाळेत देण्यात आली... या कार्यशाळेमध्ये खरेदी, बचत, उत्पादन आदी विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली...
विद्यापीठाचे तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती तसेच सेंद्रिय शेती अवलंब करणे यासह कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली... एफपीओ स्थापन करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले... या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी कु. डेहणे मॅडम तसेच भात आणि कापूस पिकावरील कीड व रोगावरील मार्गदर्शन करण्यासाठी सहयोगी प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र तारसा श्री. बिरादार तसेच कार्यक्रमाचे आयोजक म्हणुन तालुका कृषी अधिकारी श्री. कोरटे सर तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय रामटेक येथील कृषी पर्यवेक्षक श्री. उईके सर, बी. टी. एम. श्री. दोनोडे सर, कृषी पर्यवेक्षक श्री. वाघमारे, कृषी पर्यवेक्षक श्रीमती मेश्राम मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्रीमती वाहणे मॅडम तसेच कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते...
