नगरपरीषद हद्दीतुन ग्रा.पं. चा हस्तक्षेप काढा
व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे एसडीओं ना निवेदनाद्वारे मागणी
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- स्थानिक नगरपालिका हद्दीमध्ये येत असलेले रहिवासी नागरीक तथा व्यावसायीकांकडून न.प. प्रशासनातर्फे कर 'आकारणी करणे अपेक्षीत असतानाही मात्र रामटेक न.प. हद्दीमध्ये लगतच्या ग्रामपंचायत सोनेघाट ने हस्तक्षेप करून नगर परिषद हद्दीतील रहिवासी नागरिक तथा व्यावसायीकांकडून गेल्या कित्येक वर्षांमध्ये करोडो रुपयांची कर वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे... यामुळे आजपावेतो नगर परिषद प्रशासनाचे टॅक्स च्या स्वरूपात कोटी कोटी रुपयांचे नुकसान झाले यात शंका नाही. तेव्हा सदर प्रकार हास्यास्पद व तेवढाच निंदनीय असुन प्रशासकिय अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष देऊन नगर परिषद हददीतून ग्रा.पं. सोनेघाट चा हस्तक्षेप दिरंगाई न करता काढावा या मागणीचे निवेदन आज दि.६ मे ला दुपारी १२ वाजता दरम्यान स्थानिक व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघातर्फे एसडीओ प्रियेश महाजन यांना देण्यात आले...
नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या उत्तरेकडील एका मोठ्या भागावर लगतच्या सोनेघाट ग्रामपंचायत प्रशाषणाने अतिक्रमण केल्यागत तेथील रहिवाशांकडून कर आकारणी करून आजपावेतो कोटींचा निधी उकळलेला असल्याचे माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वीच एसडीओ प्रियेश महाजन तथा मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचे निदर्शनास आणुन दिले होते... यानंतर विविध वृत्तपत्रांनीही हा प्रकार चव्हाट्यावर आणुन अधिकारी वर्गाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले होते... तेव्हा प्रशाषण कामी तर लागले होते मात्र मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये संबंधीत अधिकारी वर्गाकडून झालेल्या दिरंगाईमुळे हे प्रकरण थंडबस्त्यात पडले होते... तेव्हा संतापुन जावुन पत्रकार संघानेच आज दि. ६ मे ला एसडीओ प्रियेश महाजन यांना निवेदनाद्वारे या प्रकाराकडे लक्ष वेधत हे प्रकरण विनाविलंब मार्गी लावण्याची मागणी केली... निवेदन देतेवेळी व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघ शाखा रामटेक चे अध्यक्ष राजु कापसे, महासचिव पंकज बावनकर, सदस्य प्रशांत येडके, प्रसिद्धी प्रमुख सचिन चौरसिया, प्रविण गिरडकर, सुरेंद्र बिरणवार, आदी उपस्थित होते...
