सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान घेण्यात आली. दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत यंदा निकालाची परंपरा कायम ठेवत साई इंटरनॅशनल स्कुलला उल्लेखनीय यश मिळवले आहे... शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची पुष्टी केली. या बॅचमधील प्रसून संजय मुलमुले याने ९३% गुण मिळवत तालुक्यात व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रसूनला सामोरच्या भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे... रामटेक न.प.च्या माजी उपाध्यक्ष कविता मुलमुले गृहिणी तर माजी नगरसेवक संजय मुलमुले यांचा तो मुलगा आहे... त्याच्या या यशाबद्दल त्यांच्या स्कुलमधून आणि तालुक्यातून त्याचं कौतुक व अभिनंदन केलं जात आहे... त्याने आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व आजी, आईवडील व परिवाराला दिले...
