महाराष्ट्र वेदभुमी

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी संयुक्त जनजागृती गरज'

'

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यासाठी प्रत्येक गावात लोकसहभागातून जनजागृती झाली पाहिजे. पेंच व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) अंतर्गत बफर क्षेत्रातील पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रातील २५ गावामधील सरपंच, पोलिस पाटील, तेंदू फडी मुंशी व वनकर्मचारी याची संयुक्त सभा रविवार (दी.११) अमलतास निसर्ग पर्यटन संकुल, सिल्लारी या ठिकाणी आयोजित करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक श्री. जयेश तायडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी एकसंघ नियंत्रण यांनी केले... त्यामध्ये मागील काही दिवसात तेंदू पत्ता संकलन करण्याकरिता गावकरी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात जात असून राज्याच्या सीमावर्ती भागात व बफर क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष च्या काही घटना घडल्या आहेत... त्यामुळे वनविभागा बरोबर स्थानिकांनी सुद्धा खबरदारी घेणे आवश्यक असून त्या करिता वनविभागाने पोलिस व महसूल विभाग च्या समन्वयातून सभेचे आयोजन केल्याचे सांगितले...  बनियान ट्री फाउंडेशनचे संजय करकरे यांनी मानव-वन्यजीव संघर्ष व उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी पोलिस पाटील व स्थानिक प्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाचे महत्व स्पष्ट केले...प्रमुख पाहुणे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) डॉ. प्रविण चव्हाण यांनी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या साहाय्याने वन्यजीव व्यवस्थापन आणि संघर्ष टाळण्याच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले... गावकऱ्यांना तेंदूपत्ता संकलन करताना समूहाने जाणे, शिट्टी, लाठी, भोंगा यांचा वापर करणे व अंधारात जंगलात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. कार्यक्रमाला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पोतदार उपस्थित होते... कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन जयेश तायडे यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post