महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड ते इंदापूर दरम्यान वाहतूक कोंडी,वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना,

७ ते ८ किलोमीटर वर लांबच लांब रांगा, प्रवाशी नागरिक त्रस्त,

 श्याम लोखंडे (रोहा रायगड): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठ ते इंदापूर दरम्यान गेली दहा ते बारा दिवसापासून वाहतूक कोंडी निर्माण होत असुन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा हायवे वर वाहनांच्या दररोज ७ ते ८ किलोमीटर वर लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून येत आहे...ऐन लग्न सराईत तसेच शालेय सुट्टीने वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ यामुळे प्रवाशी वर्गाला यातून मार्ग काढतांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे... तर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते तसेच वाहतूक पोलिस सर्व मार्गांवरील रायगड वाहतूक पोलिस शर्थिचे प्रयत्न करीत आहेत... मात्र प्रवासी नागरिक मात्र कमालीचे त्रस्त होऊन एकच संताप व्यक्त करत आहेत...


Post a Comment

Previous Post Next Post