अलिबाग : चाेरट्या मार्गाने गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रेवदंडा पोलिसांनी कारवाई केली आहे... रविवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास छापा मारत ७ किलो ६७२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, व्यवसाय करणाऱ्या तळेकर पती, पत्नीविरोधात कारवाई केली आहे...
तळेकर त्यांच्या घरात आणि स्वामी माऊली कॉटेजमध्ये तब्बल ७ किलो ६७२ ग्रॅम वजन असलेले १ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा गांजा तसेच १ हजार रुपये किंमतीचा वजन काटा, पिशव्या, स्टॅपलर असा एकूण एक लाख ५२ हजार रुपये किंमतीचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे... अर्चना आशिष तळेकर आणि आशिष नंदकुमार तळेकर असे या पती-पत्नीची नावे आहेत...
अमली पदार्थ गांजा असल्याची माहिती अलिबागचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र दौडकर यांना मिळाली... त्यांच्या आदेशानुसार रायगडचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रेवदंडा पोलीस ठाणेतील अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले... पथकाने थेरोंडा फाटा येथे तळेकर यांच्या घरी आणि त्यांच्या मालकीच्या स्वामी माऊली कॉटेजवर छापा टाकला.... गांजा, अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवला असल्याचे दिसून आले... त्यामध्ये अर्चना तळेकर व आशिष तळेकर यांच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...