सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तेंदु पत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच दरम्यान श्री मंगेश बालचंद मानकर रा.४१ वर्षे हे तेंदु पत्ता संकलन करत असताना अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढवीला. जंगल परिसरात या दिवसात तेंदू पत्ता संकलनाचे काम केले जाते. अशाच प्रकारे तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी शहपूर अंबाझरी सीएम २५७ पीएफ या भागात गेलेल्या इसमावर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. यात सदर इसम गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील शहपूर अंबाझरी येथे घडली आहे. यानंतर गंभीर जखमी झालेल्या मंगेश यांना देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी जखमीवर डॉक्टरांनी उपचार केले. त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आहे आहे. वनविभागाकडून नेहमीच खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत असतात. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांनी शिट्टी, मुखवटे, घुंगरू, काठी जवळ बाळगूनच कामे करावी. वन्यप्राणी असलेल्या भागात जाऊ नये. असे वनविभागाकडून आवाहन करण्यात येत आहे..
