अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबई - रायगड - नवी मुंबई या ठिकाणी असणा-या समुद्र किना-यालगत जहाजातून डिझेल चोरी हा विषय गंभीर बनत चाललेला आहे. नुकतेच अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बंदरावर सीमा शुल्क विभागाने कारवाई करत चार डिझेल टैंकर व दोन मासेमारी बोटी जप्त केल्या आहेत. सीमा शुल्क विभागाच्या कारवाईनंतर या डिझेल तस्करांना दणका मिळाला खरा पण हा प्रकार म्हणजे हिमनगाचे एक टोक असू शकते डिझेल तस्कर आणि पोलीसांच्या संगनमताने रायगड ते मुंबई समुद्र किना-यालगत जहाजातून डिझेल चोरी हा विषय गंभीर बनत चालला आहे... या प्रकरणी पोलीसही बघ्याची भूमिका घेत आर्थिक संगनमताने जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात... यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात येऊन २६/११ सारख्या हल्ल्यांची किंवा घुसखोरीची शक्यता नकारता येत नाही...
तसेच या डिझेल तस्करीमध्ये मुख्य सुत्रधार इस्तियाक शेख, राजू पंडित, लालाभाई यांच्यासह मुस्लिम समाजाचे बहुतांश तरुण मुले व मनुष्यबळ या अवैध धंदयांमध्ये सक्रीय असून या धंदयातून कमावला जाणारा लाखो करोडचा नफा या मुस्लिम संघटना वाढीसाठी व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी वापरत असल्याची खात्रीदायक माहिती मिळत आहेत... हे सर्व आपल्या देशासाठी किंबहुना हिंदू समाजासाठी धोकादायक असून सदरचा व्यवसाय करण्यासाठी आपलेच राजकरणी यामध्ये सामिल असल्याची माहिती मिळते...तरी हा प्रकार वेळीच थांबला नाही तर पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हमला होऊन आपल्या देशाचे पर्यायाने राज्याचे व शहराचे पुन्हा नुकसान होऊ शकते... तरी आपण हा गैरप्रकार लक्षात घेऊन योग्यवेळी या डिझेल तस्कर्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आदेशित करावेत अशी मागणी आपणांस पत्राद्वारे करीत आहोत... सागरी किना-यावरील सुरक्षितता मजबुत करण्यासाठी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे... मात्र काही पोलीस ठाण्यातील अधिकारीच याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मच्छिमार अवैध धंदयाची माहिती देण्यास टाळाटाळ करतात... रेवदंडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तस्करी होत असतानाही कोणतीच कारवाई होत नसल्याने पोलीसांची भूमिकाच संशयास्पद वाटत आहे...
सुरक्षिततेला धोका
किना-यावर बोटींमधून डिझेल चोरीमुळे कोट्यावधीचे नुकसान तर होतेच परंतु सागरी सुरक्षिततेला थेट आवाहन दिले जात आहे... थोडेफार आर्थिक देवाणघेवाणीतून संगनमत करत पोलीस प्रशासनही या प्रकाराला पाठबळ देत असल्याच्या चर्चा होत आहेत... या प्रकरणात इस्तियाक शेख, लालाभाई, राजू पंडित व कन्हैया या तस्करांची नावे पुढे आली आहेत... राजकिय वरदहस्त असल्याचा ते तस्कर स्वतःच कबुल करतात... मात्र प्रश्न सुरक्षिततेचा येतो त्यामुळे या स्थितीचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे...
कस्टम पोलीस कारवाईकरिता किंवा पनवेलमध्ये डिझेल चोरीचा ट्रक पकडला जातो मात्र रेवदंडा पोलीसांकडून कुठलीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही... हा सर्व प्रकार म्हणजे कुंपण शेत खात असल्याचे दिसते...
तस्करांची मोडस ऑपरेटिंग
इस्तियाक शेख, कुंदन म्हात्रे, समीर पारंगे आणि प्रविण अबटे हे माफिया सम्राट असल्याचे बोलले जाते मग त्यांची कामेही ठरलेली... त्यापैकी इस्तियाक शेख हा सराईत असून मोठ्या जहाजांमधून डिझेल लहान नावेत टाकतात... कुंदन म्हात्रे हा बेलापूरचा असल्याने स्थानिक परिस्थिती संभाळतो तर समीर पारंगे आणि प्रविण अवटे टैंकर वाल्याना बोलावून टँकरमध्ये तेल भरतात... अशीही चौघांची टिम डिझेल चोरीचा काळाबाजार करतात. इस्तियाक शेख हा जहाजांवर चोरी करत हप्ते देण्यासाठी तगादा लावतो... सर्व तेल माफियानी समुद्रातील सुरक्षिततेला छेद देऊन करोडो रुपयांची अवैध संपत्ती कमावली आहे... इस्तियाक शेख हा मोठा तेल माफिया आहे. लहान बोटींना फोन करुन तो धमकावण्याचे काम करतो... कोस्टल गार्डपासून पोलीस विभाग आणि सर्वानाच आपल्या खिश्यात ठेवून तो फिरत असल्याचे सांगत असल्याचा ऑडिओ सर्वत्र फिरत आहे... यात चक्क अलिबाग पोलीस अधिक्षकांना हप्ते दिल्याचे तो सांगतो... असे निवेदनात लिहिण्यात आले आहे... सदरच्या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवराज्य ब्रिगेड रायगड जिल्हाप्रमुख आकाश राणे यांनी दिली आहे...