'नरसिंह अवतार' झाकी ठरली आकर्षित
२६ एप्रील पार पडला बक्षीस वितरण समारंभ
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- श्री पोद्दारेश्वर राम मंदिर नागपुर येथे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा २०२५ सोहळा नुकताच रामनवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला. त्यात क्रमांक प्राप्त करणाऱ्या झाक्यांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक २६ एप्रिल रोज शनिवारला सायंकाळी श्री पोद्दारेश्वर राम मंदिर गोस्वामी तुलसीदास प्रांगण नागपुर येथे पार पडला...यात पर्यटक मित्र तथा रामधाम चे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांच्या मनसर येथील रामधामच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकाविल्याने बक्षीस वितरण सोहळ्यात या झाकीला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले...
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा सोहळ्यात तब्बल १८६ झाक्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत सहभागी झालेल्या झाक्यांमध्ये चंद्रपाल चौकसे यांच्या मार्गदर्शनात तथा मोहन कोठेकर यांच्या नियोजन व नेतृत्वात प्रस्तुत केलेल्या रामधामच्या ' नरसिंह अवतार ' झाकीने प्रथम क्रमांक पटकावून रामधाम, मनसर चे नावलौकिक वाढविले... यावेळी चंद्रपाल चौकसे संस्थापक रामधाम, श्री मोहन कोठेकर झाकी डायरेक्टर, कु. अतुल पोटभरे. श्री ईश्वर हांडे, कुमार वेदांत कोठेकर यांनी प्रथम पुरस्कार स्वीकारला...
झाकीमध्ये मनसर येथील रामधाम तथा रामटेकच्या काही कलावंतांचा समावेश होता... या कलावंतांचे परीसरात कौतुक केल्या जात आहे... पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रमोद मुंदडा ( डायरेक्टर प्लेटिना हार्ट हॉस्पिटल )तथा प्रमुख अतिथी श्री रमेश अक्षय कुमार मेहता, श्री पुनीतजी पोद्दार ,श्री सुरेशजी अग्रवाल, श्री सुरेशजी जग्यासी, उपस्थित होते...