पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर)
कोलाड पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे... तसेच आय. एस.ओ.९००१:२०१५ नुसार ए प्लस या अति उत्कृष्ट श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे... सदरील पुरस्कार शनिवार १९ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या हस्ते कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला..
यावेळी आपल्याला मिळालेले स्मार्ट पोलीस ठाणे पुरस्कार तसेच आय.एस.ओ ९००१:२०१५ पुरस्कार नुसार ए प्लस या अति उत्कृष्ट श्रेणी हे सर्व माझ्या टीमच्या मेहनती मुळे शक्य होत असल्याने नितीन मोहिते यांनी सांगितले... याबाबत अधिक माहिती देताना नितीन मोहिते यांनी सांगितले की जनतेच्या सेवेसाठी कोलाड पोलीस ठाण्यामध्ये सर्व ठिकाणी विविध सूचना फळक,अभ्यासगत कक्ष, तयार करणे येणाऱ्या जनतेला बसण्यासाठी सुसज्य आसन व्यवस्था, तक्रारदारांसाठी व्हिजीटर बुक ठेवणे, पिण्याचे पाणी व्यवस्था करणे, प्रसाधनगृहाची व्यवस्था, तसेच सुसज्ज प्रतीक्षालय बनवणे, यासारखे साधारण ३५ सुधारणा करण्यात आल्या आहेत... त्यामुळे पोलीस ठाण्याचे स्वरूप पूर्णतः बदलून टाकण्यात आलेले आहे. या सर्व निष्कांच्या आधारावर तसेच तेथे आलेल्या प्रत्येक नागरिकांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असून,आलेल्या प्रत्येकाची तक्रार ऐकून त्यांना योग्य तो सल्ला व मदत करीत असल्याचे सांगून माझ्या सर्व टीमने घेतलेला मेहनतीमुळे सदरील उपरोक्त पुरस्कार कोणाला पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे नितीन मोहिते यांनी सांगितले
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोलाड शहर व विभागातून कोलाड पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते व त्यांच्या टीमचे अभिनंदन व कौतुक होत आहे..
