राज्यमंत्री जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-रामटेक आगारात गेल्या अनेक वर्षापासून बसेसची कमतरता भेडसावत होती, परंतु आता ही समस्या समाप्त झाली आहे... राज्यमंत्री जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे रामटेक आगारात पाच नवीन बसेस दाखल झाल्या असून, नव्या एसटी बस सेवेचा लोकार्पण दिनांक २१ एप्रिल रोजी रामटेक बसस्थानकात ॲड.जयस्वाल यांच्या हस्ते पार पडला... राज्यमंत्री जयस्वाल यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, “प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची कमतरता दूर करणे हे आमचे प्राथमिक काम होते. ही कमतरता आता समाप्त होत आहे. या नवीन बसेसमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल...” आगाराला आणखी पाच नव्या बसेस उपलब्ध होणार... यामुळे रामटेक, पारशिवनीनी, मौदा तालुक्यातील विद्यार्थी व प्रवाशांना सर्व सामान्य जनतेला, खेडोपाडी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल... याप्रसंगी आगार व्यवस्थापक रानी तिवारी, शिवसेना रामटेक शहर प्रमुख राजेश किंमतकर, माजी जि. प.सदस्य नरेश धोपटे, माजी सभापती बिकेंद्र महाजन, धर्मेश भागलकर, शिवसेना उपशहर प्रमुख विश्वास पाटील, शाळेतील विद्यार्थी, प्रवाश्यांसह एसटी विभागाचे वाहतुक निरीक्षक बाबुलाल मेश्राम, सहा.अधिक्षक वैशाली शेमसकर, वाहतुक नियंत्रक जगदिश बडवाईक, सहाय्यक यांत्रिक साक्षी चव्हाण, वैशाली घुसे, निमेश्वरी माने, उज्वला ठाकरे, ज्योती सलामे, आशिष वाटमोडे, प्रशांत वैध, दिनेश खिचर व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते...
रामटेक आगारात बसेसची कमतरता ही एक मोठी समस्या होती, ज्यामुळे प्रवाशांना अनेकदा त्रास करावा लागत असे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राज्यमंत्री जयस्वाल यांनी पाठपुरावा केला... त्यांच्या प्रयत्नांमुळे आता रामटेक आगाराला नवीन बसेस मिळाल्या आहेत... नवीन बसेस दाखल झाल्यामुळे आगाराची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवाशांना वेळेवर बसेस मिळतील...- रामटेक आगार व्यवस्थापक राणी तिवारी
