अगस्ती आश्रम सल्लागार समिती व भारतीय जनसेवा मंडळाचा ठराव
स्व. गोपालदास महाराज यांच्या मृत्युपत्राच्या अनुषंगाने घेतला निर्णय
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- प्रख्यात श्रीराम गडमंदीर परिसरात असलेल्या संत श्री अगस्ती मुनी आश्रम चे समस्त कामकाज तथा अधिकार गोपालदास महाराज ते जिवंत असेपर्यंत होते... त्यांच्या पश्चात त्यांनी करून ठेवलेल्या मृत्युपत्रानुसार सर्व अधिकार त्यांचे शिष्य तुकाराम बाबा यांचे होते. मात्र गेल्या एक-दिड वर्षापुर्वी तुकाराम बाबांचाही मृत्यु झाल्याने गोपालदास महाराज यांच्या मृत्युपत्रानुसार एका वैरागी, ब्रम्हचारी व्यक्तीला अगस्ती मुनी आश्रम चा पिठासीन करण्याचे लिहले होते. त्यानुसार १६ एप्रील ला होटल शिकारा येथे पार पडलेल्या अगस्ती आश्रम सल्लागार समिती व भारतिय जनसेवा मंडळाच्या बैठकीमध्ये गोंदिया जिल्हयातील सालेकसा येथील तिनखेडी आश्रम चे ग्यानीदास महाराज हे अगस्ती मुनी आश्रम चे पिठासीन राहाणार असल्याचा निर्णय तथा ठराव एकमताने घेण्यात आला आहे. बैठक माजी आमदार आनंदराव देशमुख यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात प्रामुख्याने भारतीय जनसेवा मंडळाचे चंद्रपाल चौकसे, मल्लीकार्जुन रेड्डी यांचे सह सदस्यगण उपस्थित होते. येत्या २८ एप्रीलला गोपालदास महाराज यांची पुण्यतिथी आहे.. व याच दिवशी ग्यानीदास महाराज यांना अगस्ती मुनी आश्रम चा ताबा सोपविण्यात येणार आहे... ह्या मुळे आश्रमाची कार्यप्रणाली पूर्वीसारख्या चालू होतील. ६ एप्रील ला रामनवमी पासुन महामुनी अगस्ति आश्रम मधे प्रति दिवस यात्रेकरू करिता निशुल्क भोजन व्यवस्था चालू केली आहे अशी माहिती भारतीय जनसेवा मंडळचे सहसचिव सुभाष बघेले यांनी दिली... यावेळी अगस्ती आश्रमचे मार्गदर्शक सदस्य माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, एड. प्रफुल अंबादे, अशोक पटेल, भालचंद खोडे, संतोष शेंडे, एड.आनंद गजभिये, भारतीय जनसेवा मंडळचे धनराज काठोके, सुभाष बघेले, शेखर बघेले, चंद्रकांत ठक्कर, विनायक डांगरे, नत्थू घरजाळे, ऋषी किंमतकर, गोपाल बाबाचे शिष्य सुरेश सोनकुसरे, वैदेही कोरे आदि उपस्थित होते..
