महाराष्ट्र वेदभुमी

टाकादेवी-बोंबीलवीरा येथील राजेंद्र पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन,

सोगाव -अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील टाकादेवी-बोंबीलवीरा येथील राजेंद्र पवार(वय५८)यांचे सोमवार दि. २१ एप्रिल २०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे...

        सर्वांसोबत हसतखेळत व मनमिळाऊ स्वभाव असणारे राजेंद्र पवार यांना सोमवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले होते, यावेळी घरातील नातेवाईकांनी त्यांना त्वरित अलिबाग येथील शिंदे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवारांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारासाठी एकच गर्दी केली होती... त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी दुपारी १२ वाजता बोंबीलवीरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले...राजेंद्र पवार हे रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल(आप्पा) थळे यांच्याकडे गेली ३२ वर्षे वाहनचालक म्हणून कार्यरत होते, सुनिल थळे यांचे ते अत्यंत विश्वासू तथा खास सहकारी होते, त्यांनी आपल्या गरीब व बेताच्या परिस्थितीत इमानेइतबारे काम करून मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण दिले, त्यांची मुलगी आज रायगड जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे... राजेंद्र पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, भावजय व पुतण्या, नात असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशपिंड मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी तर तेरावे शुक्रवार दि. २ मे रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post