महाराष्ट्र वेदभुमी

सौ.वरदा सुनिल तटकरे कन्यादान योजना गोवे ग्रामपंचायत तर्फे चार वर्षांपासून सुरु,

कन्यादान योजनेचे शिल्पा हिस दिला ५००० रुपयाचा धनादेश 

पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर)

   रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोवे यांच्या मार्फत ग्रामपंचायत हद्दीतील गोवे येथील रहिवाशी लक्ष्मण सखाराम  दहिंबकर यांची कन्या सुजाता (शिल्पा) हिला लग्नात कन्यादानाची भेट म्हणून एक साडी व ५००० रुपयांचा धनादेश देण्यात आला...

      रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या वतीने गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी गेली चार वर्षांपूर्वी  सौ. वरदा सुनिल तटकरे यांच्या नावाने कन्यादान योजना सुरु केली असुन या ग्रामपंचायत हद्दीतील गोवे, मुठवली, शिरवली, येथील गावातील मुलीचे लग्न ठरले तर तिच्या लग्नाच्या वेळी तीला कन्यादान म्हणून एक साडी व ५००० रुपये भेट म्हणून दिली जाते.ही योजना सौ.वरदा सुनिल तटकरे यांच्या नावाने सुरु असुन ही योजना सुरु करणारी रोहा तालुक्याच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे...

      रविवार दि.२० /४ /२०२५ रोजी गोवे येथील लक्ष्मण सखाराम दहिंबेकर यांची कन्या सुजाता (शिल्पा) हिच्या विवाह निमित्ताने कन्यादान म्हणून एक साडी व ५००० रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळी विभागीय अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जाधव, उपसरपंच निशा जवके, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार, नितीन जाधव,रंजिता जाधव, अंजेली पिंपळकर,भावना कापसे,माजी सरपंच स्नेहा पवार,तसेच असंख्य महिला वर्ग उपस्थित होत्या...

Post a Comment

Previous Post Next Post