हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, सुंदरकांड पठण, हवन, हनुमान चालिसा, भजन दहीहंडी, महाआरती करण्यात आली. खैरी बिजेवाडा येथील हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष आर. श्रीनिवास राव, आनंद यादव,सुदेश यादव, रमेश नाटकर, पुजारी आदेश नाटकर, ऍड. संजय खंडेलवाल, कमलाकर हिंगे, विष्णू हिंगे, जयदेव डडोरे, विष्णु हिंगे, राजवामन, बबनराव कोठेकर, मनीष डडोरे, आयुष डडोरे, कर्तिक राउत, रोहन नान्हे, अजय बरबटे सहित आदींनी प्रयत्न केले... विशेष - बाब म्हणजे आनंद यादव यांचे वडील आणि आजोबा यांच्या काळापासून त्यांचे कुटुंबीय या मंदिरात ५५ वर्षांपासून महाप्रसादाचे योगदान देत आहेत. गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरात मधे गिरीश काठिकर, सुमित कोठारी, दिनेश माकडे, नरेश माकडे, महेश माकडे, गजानन गुंडुकवार, रेखा गुंडुकवार, अरविंद कोहळे, कांचन कोहळे, सुरेखा माकडे, गणेश कोल्हे, रघुनाथ वाघमारे आदींनी कार्यक्रमा करिता परिश्रम घेतले... राम मंदिर,लंबे हनुमान मंदिर, पिपलेश्वर हनुमान मंदिर, शिव नगर हनुमान मंदिर आदी मंदिरात विविध कार्यक्रमां कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते... हनुमानजींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला... रामटेक आणि परिसरामध्ये पोलिस खात्याकडे १२० मंदिरांची नोंदणी आहे... त्यासोबत अनेक प्राचीन छोटी मंदिरे आहेत... त्याठिकाणी धार्मिक विधीसह महाप्रसाद करण्यात आला... कडक ऊन असूनही लोकांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली... भक्त म्हणाले की मन्नत पूरी करणारे चिरंजीवी हनुमानजी आहेत...
