महाराष्ट्र वेदभुमी

पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा रामटेकमध्ये निषेध

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा धर्म विचारून हत्या केल्याचा निषेधार्थ तीव्र निषेध व्यक्त करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने २५ एप्रिल रोजी गांधी चौकात आंदोलन करण्यात आले... यावेळी कार्यकर्त्यांनी दहशतवाद्याचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जात आहेत... भारत मातेच्या जयघोषात आणि दहशतवाद्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दहशतवाद्याला नेस्तनाबूत करण्याची मागणी करण्यात आली... यावेळी मोर्चात सहभागी नागरिकांनी पाकिस्तानी ध्वज जाळून 'दहशतवाद संपवा माणसांना वाचवा' अशीही नारेबाजी केली. संपूर्ण जगाला दहशतवादाची समस्या भेडसावत आहे. आता भारत सरकारने त्या सर्व दहशतवाद्यांना गोळ्या घालुन ठार मारा अशी विनंती रामटेक शहरातील जनतेनी केली... यावेळी दुर्गावाहीनी व मातृशक्ती की महिला मीनाक्षी ठाणेकर, शुभांगी सावंत, माधवी घुणे, प्रिती भेंडारकर, श्रेया गावंडे, दृष्टी बिसमोगरे अंजली उपासे, सह प्रकाश कस्तुरे, महेश सावन, भूषण नानोटे, पप्पू यादव, अमोल गाढवे, सोमेश तिवारी, विश्वास पाटील, कामळे, पिंटू शर्मा, आनंद चोपकर, अनुराग दुबे, महेश दुबे, रामसिंग सहारे, दत्तु पंडे, चंद्रकांत ठक्कर, मोहीत सोमनाथे, शिवसेना नेते तथा माजी नगरसेवक सुमित कोठारी आणि शेकडो हिंदू बांधव उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post