महाराष्ट्र वेदभुमी

नवीमुंबई (गोठीवली) पहीली एम.डी.डॉक्टर तेजल पाटील

 


मुंबई प्रतिनिधी : सतिश वि.पाटील नवीमुंबई (गोठवली) गावातील पहीली एम.डी.डॉक्टर तेजल पाटील हिने अथक मेहनत व परिश्रम घेऊन एम.डी.ड्रीग्री मिळवली.विशेष म्हणजे लग्न झाल्यावर बाईला चूल मुल हे समीकरण असते.आणि खरंच प्रपंचात पडल्यावर खूप जिम्मेदारी असते एक आपण आपले माहेर सोडून सासरी गेलेलो असतो नवीन घर नवीन माणसं पण तसं न होता सासू,सासरे ,नवरा यांनी पुढील शिक्षणात मदत केली व मेहनतीला यश आले.तेजल यांचे प्राथमिक शिक्षण ऐरोली येथील सेंट झेवियर्स स्कूल मधून झाले.पुढे नाशिक येथील सप्तशृंगी वैद्यकीय महाविद्यालयातून बीए.एम.एस. (एमडी) ची पदवी संपादन केली .या तीच्या कार्याचे कौतुक सर्व स्थरांतून होत आहे .इच्छाशक्ती व मेहनत याच्या बळावर आपण निश्चित यशवंत होतो हे आजच्या पिढीला एक चांगला मेसेज समाजात जात आहे .अभिनंदन डाॅ.तेजल पाटील...

Post a Comment

Previous Post Next Post