महाराष्ट्र वेदभुमी

ईद सणानिमित्त काँग्रेसचे डॉ. नरेंद्र सिंग यांची फारुख परकार यांना सदिच्छा भेट

 


माणगाव (नरेश पाटील) – रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. नरेंद्र सिंग यांनी ईद सणाच्या निमित्ताने कार्यकर्ते फारुख परकार यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजाने ईद मुबारक हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला...

या सणानिमित्त काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते फारुख परकार यांनी डॉ. नरेंद्र सिंग तसेच कोकणातील काँग्रेस प्रतिनिधींना खास आमंत्रित केले होते. दिलेल्या आमंत्रणास मान देत, सोमवारी, दिनांक ३१ मार्च रोजी, ईदच्या दिवशी डॉ. नरेंद्र सिंग यांनी फारुख परकार यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि काही वेळ त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या...

या वेळी रोहा नगर परिषदेचे माजी नगरसेवक रामप्रकाश खुसवाहा, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव, तसेच डॉ. सिंग यांचे नातू कु. किसन राजकुमार सिंग उपस्थित होते... फारुख परकार यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आत्मीय स्वागत केले आणि ईदच्या शुभदिनी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले...

दरम्यान, सर्व पाहुण्यांनी फारुख परकार यांना ईद सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आणि सणाचा आनंद साजरा केला. यावेळी परकार यांनी सणाच्या निमित्ताने पारंपरिक गोड पदार्थ ‘शीरखुर्मा’ वाटप केला...

फारुख परकार यांनी सांगितले की, ईदच्या दोन दिवस आधी कोकणातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र मधुकर ठाकूर (राजा भाऊ) यांनी खास माणगावला येऊन त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या...

सणानिमित्त सद्भावनेचे वातावरण या भेटीमुळे सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचा संदेश पसरला असून, विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करावा, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला...

Post a Comment

Previous Post Next Post