माणगाव (नरेश पाटील): वॉर्ड क्रमांक 16, खांदाड भागातील तलाव उन्हाळ्यामुळे पूर्णतः कोरडा पडला होता. मागील काही दिवसांपासून येथे मगरींच्या संचाराबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता या तलावाविषयी एका नव्या आणि आश्चर्यकारक घटनेची माहिती समोर आली आहे..
तलाव सांडपाण्याने पूर्णतः भरला आहे!
दि. 23 मार्च 2025 रोजी तलावात अचानक पाणी भरू लागल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. रात्रीच्या अंधारामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही... मात्र, दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता, मोर्बा रोडकडील सांडपाणी पावशा नाल्यामार्फत वाहत आल्याने तलावात साठल्याचे स्पष्ट झाले...
या मार्गावरील गटार काही ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याने अडले होते, त्यामुळे सांडपाणी ओसंडून वाहू लागले... याशिवाय, खांदाड भागातील नालाही या गटाराशी जोडलेला असल्याने संपूर्ण सांडपाणी तलावात जाऊन तुंबले... परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल आणि दुर्गंधी पसरली आहे...
स्थानिकांची संतापजनक प्रतिक्रिया
या प्रकाराबाबत एकता मित्र मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी सांगितले की, नगर पंचायत व लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि उपाययोजना कराव्यात...
ज्येष्ठ रहिवाशी वालेराव साहेब यांनी सांगितले की आमचा या भागात आलेल्या पाणी अतिशय घाण पाणी आली आहे. तर आम्हा आरोग्यास त्रासदायक आहे...
दरम्यान या तलाव पाण्यात भटके कुत्रे यांना चालण्यास अंनत अडचण दिसत होते...दरवर्षी उन्हाळ्यात हा तलाव कोरडा पडतो, पण त्यात कधीच सांडपाणी वाहून आले नव्हते... यंदा मात्र प्रथमच अशी परिस्थिती उद्भवली आहे...यावरून स्पष्ट होते की, माणगाव शहर झपाट्याने वाढत असताना गटार, नाले आणि मोऱ्यांच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे...
मुख्य बाजारपेठ आणि रहिवासी भागांमध्येही दुर्गंधी मोठी समस्या बनली आहे... त्यामुळे माणगाव नगर पंचायतने त्वरित कारवाई करून या समस्येवर ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे...
