महाराष्ट्र वेदभुमी

आनंदधाम येथे होणार भव्य सामूहिक विवाह सोहळा

 


३ एप्रिल महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

 रामटेक :- परमात्मा एक मानवधर्म संस्थापक, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०४ व्या जयंती पर्वावर व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत परमात्मा एक आनंदधाम रामटेकच्या सौजन्याने निर्मित 'आनंदी सेलिब्रेशन लॉनमध्ये सोळाव्या वर्षीचा भव्य सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम ३ एप्रिल गुरुवारला  लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व ब्रँड अँबेसिडर रामटेक यांच्या मार्गदर्शनात होणार आहे...

सदर सामूहिक विवाह सोहळ्यात निराधार असलेले २१ जोडपे विवाहबद्ध होणार असुन मानव धर्माचे संस्थापक, (परमात्मा एक )महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०४ व्या जयंती निमित्त आनंद धाम ,रामटेक येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यमंत्री तथा आमदार आशीष जयस्वाल, विजय हटवार नमो नमो अध्यक्ष यांचेसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे... सामूहिक सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणाऱ्या सर्व वधू वरास आशीर्वाद देण्यासाठी सेवक, सेविकांनी आणि बालगोपाळांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post