महाराष्ट्र वेदभुमी

"चला पैठणी जिंकूया " स्पर्धेला महीलांचा प्रचंड प्रतिसाद



रामटेकच्या आपुलकी फाऊंडेशन चा स्तुत्य उपक्रम

 सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : सणासुदीचे असोत की, पारंपारीक उत्सव. घरचे लग्नकार्य असो किंवा कोणताही सोहळा. महीला वर्गाची पहीली पसंती असते ती पैठणीला, पदरावर असलेली मोराची नक्षी, साडीवरची खास नक्षी, पैठणीला लावण्यात येणारी जर यामुळे ही साडी अधीक उठून दिसते... भर्जरी आणी दिमाखदार ठेवणीतल्या या पैठणी साड्याची भुरळ महीला भगिनींना पडणार नाही हे नवलच! अशाच पैठणीची भुरळ पाडणारी एक अभिनव स्पर्धा रामटेकच्या आपुलकी फाऊंडेशन (महीला मैच) यांनी आयोजीत केलेली आहे... या स्पर्धेत रामटेककर महीला भगिनी उत्साहात सह‌भागी होत असून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरु असल्याचे आयोजकांनी सांगीतले... ही स्पर्धा दोन वयोगटात विभागण्यात आली आहे. २५ ते ४० वर्ष विवाहीत महीलांचा एक तर ४१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहीत महिलांचा दुसरा वयोगट आहे... दोन्ही वयोगराकरीता प्रथम, व्दीतीय व तृतीय अशे तीन पुरस्कार दिले जाणार आहे... दोन्ही गटातील तीन-तीन अश्या सहा महीलांना पैठणी पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात येणार आहे... सोबतच एकुण दहा प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे...
आपुलकी फाऊंडेशन (महीला मॅच)च्या मुख्य आयोजक महीला स्पर्धेत सहभाग नोदंवू ईच्छीनाऱ्या महीला भगिनीचे नोंदणी फॉर्म भरुन घेत असल्याने रामटेक महीलामधे नवचैतन्य निर्माण होत असल्याचे जाणवत आाहे...
"चला पैठणी जिंकूया" या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महीलांना आपल्या मुख्यव्दारासमोर 'आकर्षक वेशभुषेत पुर्ण साईज फोटो काढून आयोजक महीला यांच्या वॉट्‌सप नंबरवर पाठविणे आवश्यक आहे... स्पर्धक महिलेचा फोटोला भारतीय व मराठी संस्कृतीला साजेसा असणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगीतले...
या स्पर्धेकरीता कविता मुलमुले, उज्वला धमगाने, चित्रा धुरई पद‌‌मा ठेंगरे, समीता पटले, शिल्पा रणदीव, मीनल भारंबे, निता पायतोड, ललीता बावन‌थडे, श्वेता गोन्नाडे, सोनी धुरई, समीक्षा धमगाये, अर्चना ठक्कर सुषमा मानापूरे, कल्याणी ठे.गरे, रोहीणी नागोसे, नेहा गावंडे, प्रीया मानकर रश्मी गोन्नाडे, श्रद्धा कावळे, करीश्मा महाजन, साक्षी धुरई, पुनम मानकर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post