सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड सायंस येथे १ एप्रील २०२५ ला रामकृष्ण नवजीवन आश्रम अंबाळा आणि रामकृष्ण मठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंदांचे विचार दर्शन या चल पुस्तकाची प्रदर्शनी आयोजित केली होती.. प्रदर्शनी मधे मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की स्वामी विवेकानंद आजही तरुणांचे आदर्श आहेत... देश आणि धर्मासाठी काम करण्याची प्रेरणा देणारे त्यांचे विचार नव तरुणांना आकर्षित करतात... जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्या कर्तव्याचा बोध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचले पाहिजे असे ते म्हणाले... यावेळी डीन डॉ. विलास महात्मे प्राध्यापक, कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते... विशेष बाब म्हणजे स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन आणि बेलूर मठ, कोलकाता यांच्या स्थापनेच्या १२५ व्या वर्षानिमित्त संपूर्ण भारतात विवेकानंद विचार प्रदर्शनी आणि पुस्तक विक्री चा उपक्रम सुरू आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत... लहान मुलांना आवडतात अशा काॅमिक्स मध्ये रामायण, महाभारत, विविध साधुसंतांची चरित्रे, विविध वयोगटाच्या विद्यार्थ्यांना समजेल, उमजेल अशा भाषेतून स्वामी विवेकानंदांचे चरित्र आहेत...
