महाराष्ट्र वेदभुमी

विरोध होताच न.पंचायत कर्मचाऱ्यांची माघार. नागरिकांच्या प्रशासनाकडे चार मुख्य मागण्या

माणगाव :- (नरेश पाटील) माणगाव नगर पंचायतच्या सफाई कर्मचार्‍यांना नाल्यातील ठाकलेली माती हटवण्यासाठी पाठवण्यात आले असताना स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे काम थांबवून माघारी जावे लागले, अशी घटना शुक्रवारी  दि.11 एप्रिल, रोजी सकाळी पावणे दहा चा सुमारास घडली...

याबाबत अधिक माहिती अशी की, खांदाड येथील राजीप मराठी शाळेपासून पुढे अंतर्गत मोर्बा रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नगर पंचायतमार्फत पावसाचा नाला बांधण्यात आला होता. मात्र, या नाल्यास लेआउट न दिल्यामुळे त्याचे बांधकाम अर्धवटच झाले.  दरम्यान या अपूर्ण कामामुळे एका तीन मजली इमारतीच्या सेप्टिक टाकी फुटले आणि अनेक महिन्यांपासून सांडपाणी थेट या नाल्यात वाहत राहिले. परिणामी नाल्यात सांडपाणी साठून दुर्गंधी, डासांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले...


या समस्येपासून संरक्षणासाठी स्थानिक नागरिकांनी नाल्यात माती टाकून सांडपाण्याचा प्रवाह अडवला होता.  दरम्यान, ज्येष्ठ नागरिक वालेराव ते किशोर डोंगरे यांच्या घरासमोरील नाल्यातही सिमेंट काँक्रेट व माती टाकण्यात आली होती.   ही बाब गुरुवारी 10 एप्रिल सकाळी ७:३० वाजता निदर्शनास आली आणि संबंधित नागरिकांनी आमचा जिल्हा प्रतिनिधीकडे तक्रार केली...

त्यानंतर मीडियात ही बाब उघडकीस येताच नगर पंचायत स्वच्छता विभागाने तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांना माती हटवण्यासाठी दि. 11 एप्रिल पाठवले.  मात्र, काम सुरू होताच स्थानिक ज्येष्ठ महिलांनी याला विरोध केला. 

नागरिकांनी प्रशासनाकडे चार मुख्य मागण्या मांडल्या..

1. अपूर्ण नाल्याचे बांधकाम पूर्ण करणे,

2. नाल्यातील वाहणारे सांडपाणी रोखणे,

3.मोटर लावून संपूर्ण सांडपाणी बाहेर काढणे आणि स्वच्छता करणे,

4. परिसरात डीडीटी पावडर फवारणी करणे.

5. नाल्याची साफसफाई करणे. 

या मागण्या पूर्ण न करता माती हटवण्यास विरोध करण्यात आला. विरोधाची माहिती मिळताच सॅनिटरी इन्स्पेक्टर व अभियंता तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, महिलांनी त्यांनाही सुनावले आणि काम थांबवून सर्वांना माघार जाण्यास भाग पाडले...

या प्रकारामुळे नगर पंचायतवर जनतेपुढे नामुष्कीची वेळ ओढवली. आता प्रशासन या समस्येवर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  दरम्यान न.पं. कडे अर्धवट बांधलेला नालयाचा समस्या बाबत गेल्या वर्षीव दि. 18 डिसेंबर, 2024 रोजी एक अर्ज स्थानिक नागरिक यांनी सादर केली गेली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post