महाराष्ट्र वेदभुमी

रामधाममध्ये नवरात्र व रामगजरचा जल्लोष

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक -: तालुक्यातील मनसर येथे असलेल्या रामधाम येथे नवरात्र तथा रामनवमी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला... यावेळी प्रामुख्याने रामधामचे संस्थापक तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे व त्यांच्या पत्नी संध्याताई चौकसे यांचे परिसरातील भावीक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते... चैत्र नवरात्र उत्सवाची मोठ्या थाटात तयारी करण्यात आली होती... ३० मार्चला सकाळी नऊ वाजता माता वैष्णोदेवी मंदिरात विधिवत घटस्थापना व अखंड मनोकामना ज्योत सौ संध्याताई चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली होती... पूजन दुर्गा सप्तशती पाठ आरती नवरात्राचे नऊ दिवस दररोज भजन मंडळ, भक्तीसंगीत चे आयोजन करण्यात आले... विधीवत पूजा अर्चना हवन व कन्याभोजन करून ६ एप्रिल ला घट विसर्जन करण्यात आले तसेच रामनवमीनिमित्त दुपारी बारा वाजता भगवान श्रीरामाची विधिवत पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला... यावेळी श्री चंद्रपाल चौकसे संस्थापक रामधाम तीर्थ, श्री दूधरामजी सव्वालाखे, तेजपाल सोलंकी, शशांक ढेपे, मंगेश कठोते, रितेश कुंभरे, सागर बाजनघाटे, प्रदीप गजभिये, रामप्रसाद अमृते, हर्ष धुरवंश, खुशी मुदलियार, शिवचरण जेटमल इत्यादी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post