महाराष्ट्र वेदभुमी

रेल्वेची धडक लागून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

 


माणगाव :- (नरेश पाटील) रेल्वेची धडक लागून ३०वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माणगाव तालुक्यात घडली आहे... पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि.  ६  एप्रिल रोजी रात्री २.४२ वाजता रेल्वे गाडी क्रमांक १२४५० गोवा संपर्क क्रांती या गाडीच्या समोर आल्याने इंदापूर किमी स्टोन क्रमांक २४/२, २४/३ दरम्यान मयत सचिन कृष्णा मुंढे, वय ३० वर्ष, रा. कशेणे यास ठोकर लागून लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला...  या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. राठोड करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post