महाराष्ट्र वेदभुमी

दु :खद बातमी! श्रीमती रजनीताई केणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

मुंबई प्रतिनिधी सतिश पाटील 

एक निडर ,डॅशिंग नेतृत्व हरपले नेहमीच मार्गदर्शक असणारी श्रीमती रजनीताई केणी दिनांक:१३ एप्रिल २०२५.रोजी सर्वांना सोडून गेली...

भाजपच्या मुलुंडमधील माजी नगरसेविका वार्ड क्रमांक १०५ श्रीमती रजनी केणी यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून मन हेलावले... त्यांच्या जाण्याने मुलुंड शहराने एक समर्पित लोकप्रतिनिधी गमावला आहे...

श्रीमती रजनी केणी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुलुंडच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न केले... त्यांच्या कार्याचा समाजावर कायमचा प्रभाव राहील... त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य दिले... त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे...

ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो.. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात सदैव जिवंत राहतील...

Post a Comment

Previous Post Next Post