महाराष्ट्र वेदभुमी

बाबा जुमदेवजींच्या जयंती पर्वावर २१ जोडप्याचे झाले शुभमंगल सावधान


परमात्मा एक आनंदधाम येथे भव्य सामुहिक विवाह सोहळा 

बाबा जुमदेवजी यांच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- परमात्मा एक चे संस्थापक परमपूज्य बाबा जुमदेवजी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या आनंदधाम सौजन्याने निर्मित 'आनंदी सेलिब्रेशन लॉनमध्येयेथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचेसह प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा व रक्तदान शिबीर ३ एप्रिल २०२५ ला थाटात पार पडले... यावेळी परमात्मा एक सेवेतील विशेषतः गोरगरीब मुलामुलींचे निशुल्क स्वरूपात लग्न उरकवुन दिल्याने आनंदधाम चे महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व रामटेक नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर लक्ष्मण मेहर ( बाबुजी ) यांचे सर्वस्तरातुन कौतुक केल्या जात आहे... आनंदधाम रामटेक येथे गेल्या १५ वर्षांपासून मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब वरवधुंचे निशुल्क स्वरूपात लग्न लावून देण्याचे कार्य निरंतर सुरु आहे... हे १६ वे वर्ष होते... यावर्षी २१ जोडपी विवाह बंधनात अडकली व त्यांनी आपल्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे... पारंपरिक हिंदू रितिरिवाजानुसार आयोजित या कार्यक्रमात नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया तुमसर या भागातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते... तर यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते... या लग्नसोहळ्यात एका लहान मुलीने स्वतःच्या वाणीत मंगलाष्टक गायले व अनघा सराफ यांनी सर्व वधुंचे कन्यादान केले. आयोजित सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाला राज्यमंत्री तथा रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार शामकुमार बर्वे, भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, माजी मंत्री राजेंद्र मुळक, उमरेडचे माजी आमदार राजू पारवे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, भाजपचे नागपूर जिल्हा महामंत्री उदयसिंग (गज्जू) यादव, जि.प.च्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकचे सभापती सचिन किरपान, सौ.अनघा सराफ (फाउंडर,अध्यक्ष, आदित्य-अनघा सोसायटी), सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कोल्लेपारा, गोपी कोल्लेपारा, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे आदी निमंत्रित मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post