स्नेहसदन विशेष शाळेत मिनी स्कुल बसचे उद्धाघाटन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : मा. ना. अँड. आशिषजी जयस्वाल राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्य स्नेहसदन विशेष शाळा शितलवाडी येथे वाढदिवशी कितीही व्यस्त असलो तरी, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मला आनंद होते... येथे नवीन प्रेरणा व नवीन जबाबदारी घ्याविशी वाटते... दिव्यांग व त्यांच्या पालकांना न्यायासाठी सरकारचे ध्येय, धोरण ठरवत आहे... त्यांचे हक्क आणि न्यायासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये यशस्वी वकीली करणार, असे प्रतिपादन राज्यमंत्री अँड. आशीष जयस्वाल यांनी केले... राज्यमंत्री अँड. आशीष जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहसदन विशेष शाळा शितलवाडी येथे गुरूवारी मिनी स्कूल बसचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले... यावेळी ते बोलत होते...
यावेळी संत गाडगे महाराज मूक बधिर विद्यालय शितलवाडी रामटेकला साउंड फुफ रूम (स्पिच थेरेपी) करीता ८५१९६० रुपये कार्यारंभ आदेश वितरण, बौद्धिक अक्षम १८ विद्यार्थ्यांना टीएलएम किट वितरण करण्यात आल. राज्यस्तरीय क्रीडा समिती सत्कार (दिव्यांग कल्याण विभाग), दिव्यांगांचे दिव्य रंग ग्रुपला संगीत साहित्य खरेदी करिता २१ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात आले... राज्यस्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात सक्रीय सहभाग घेणारे उमेश वाजूरकर व वैद्यकीय सहाय्यता सर्व दुर्लब आदिवासी घटकांसाठी राबविल्याबाबत गौरव पनवेलकर यांचा सत्कार संस्थेच्या वतीने राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला... कार्यक्रमाला पल्लवी आशीष जयस्वाल, अनिता जयस्वाल, तालुका महिला आघाडी प्रमुख रश्मी काठीकर, मुख्याध्यापक पंकज पांडे, स्नेहसदन संस्थेचे अध्यक्ष तुलसीराम अतकर, सचिव अँड. नितीन खाबोरकर, संत गाडगे महाराज मुकबधिर विद्यालय शितलवाडीचे अध्यक्ष भूषण ठोंबरे, राज्यस्तरीय दिव्यांग विभाग क्रीडा समिती व समाज कल्याण विभागाचे प्रवीण मोंढे, शितलवाडी ग्रा. पं. चे सचिव गिरमकर प्रामुख्याने उपस्थित होते...
ना. आशीष जयस्वाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
जनहिताच्च्या कामात अग्रेसर, रात्री बेरात्री नागरिकांच्या एका 'मिस कॉल' वर रिटर्न कॉल करणारे रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशीष जयस्वाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला... माजी आमदार राजू पारवे, शिवसेनेचे विविध पदाधिकारी, सरपंच मंडळी, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांच्या गर्दीने त्यांचे कार्यालय फुलून गेले होते...
