महाराष्ट्र वेदभुमी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध भारताचे कठोर पाऊल

दिल्ली वार्ताहर:

पाकिस्तान विरुद्ध भारताचे कठोर पाऊल

पहलगाम येथील भारतीय पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ल्याचा सर्वत्र जगभरातून जाहीर निषेध करण्यात येत आहे.. पाकिस्तानला याचा आता चांगलाच धडा शिकवण्यासाठी युद्ध करण्यात यावं अशी जगभरातून भावना व्यक्त होते आहे.. याच संदर्भातील आक्रमक भूमिका म्हणून भारताने पाकिस्तान विरुद्ध आता कठोर पावले उचलली आहेत..

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन स्थळांवर 27 पर्यटकांचा दुर्दैवी अंत या हल्ल्यात झाला आहे..यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने कठोर पावले उचलत पुढील घोषणा केली आहे ...

1)सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्यात आला आहे 

2)पाकिस्तानी नागरिकांचा सार्क विजा रद्द करण्यात आला 

3)पाकिस्तानला लागून असलेले अटारी सीमा बंद करण्यात आली

4)भारताने पाकिस्तानमधील आपले उच्चयुक्तालयातील अधिकारी यांना परत बोलावले आहे..

5)भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा...

अशी घोषणा भारत सरकारकडून करण्यात आले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post