अनंता म्हसकर धाटाव रोहा
रायगडच्या रोह्यात पहलगाम येथील हल्ल्याचा धर्म रक्षक हिंदुसेना आयोजित सकल हिंदु सामाजतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आज या हल्ल्याने देश हादरून गेला आहे देश शोकाकुल अवस्थेत असून देशभरातून जाहीर निषेध होत आहे.. आणि संतप्त ही व्यक्त करण्यात येत आहे...
त्याचप्रमाणे रोह्यात ही धर्म रक्षक हिंदु सेना आयोजित सकल हिंदु सामाज तर्फे जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला व हल्ल्याचे निषेध करुन शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तुषार मोरे,तेजस देशमुख, जयेश छेडा,धर्मा म्हात्रे,आप्पा देशमुख, ललित सर, मयूर दिवेकर, अरुंधती पेंडसे, सौ निर्मला भुतेकर, यज्ञेश भांड,विनायक पाटील सौ.आठवले, निकम,इंगवले,प्रल्हाद भाटे आदींसह बहुसंख्य रोहेकर उपस्थित होते यावेळी काही उपस्थितांनी भावना व्यक्त केली..
