माणगाव (प्रतिनिधी - नरेश पाटील) :
खांदाड परिसरात एका तीन मजली इमारतीमधून गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाणी थेट पावसाच्या नाल्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष व कर्तव्यदक्ष नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव, सॅनिटरी इन्स्पेक्टर मोरे, तसेच पोलीस पाटील नथुराम पोवार हेही उपस्थित होते... स्थानिक ज्येष्ठ नागरिक वालेराव, आणि परिसरातील अन्य नागरिकांनीही यावेळी आपली उपस्थिती नोंदवली. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित इमारतीच्या मालकास याआधी दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती... मात्र, मालकाने दुर्लक्ष करत रात्रीच्या वेळेत नाल्यात सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरूच ठेवला... २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा नाल्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहताना निदर्शनास आले. मालकास विचारणा केली असता त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली व सांडपाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले... यावर संतप्त प्रतिक्रिया देताना सॅनिटरी इन्स्पेक्टर मोरे यांनी स्पष्ट इशारा दिला – "जर दोन दिवसांत सांडपाणी नाल्यात सोडणे थांबवले नाही, तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात येईल व कायदेशीर कारवाई होईल." या प्रसंगी नगरसेवक पोवार यांनी ठामपणे सांगितले की,"पावसाच्या नाल्याचा उपयोग फक्त पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीच असतो. त्यात सांडपाणी मिसळणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकारांवर कोणतीही तडजोड होणार नाही." दरम्यान पोवार यांचे नगराध्यक्ष कार्यकाळात स्वच्छता मोहीम अंतर्गत नाले, गटारे, मोऱ्या आणि बाजारपेठ स्वच्छ करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर राबवले गेले होते...आजही माणगावकर त्या कार्याची आठवण अभिमानाने करतात...
दरम्यान, पोलीस पाटील नथुराम पोवार यांनी काही दिवसांपूर्वी देखील सदर इमारतीसमोर सांडपाणी वाहत असल्याची दखल घेत, मालकास तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते... 'एकता मित्र मंडळ'च्या सचिव आणि माजी तत्कालीन सरपंच सौ. सुखदा धुमाळ यांनीही व्हॉट्सअॅपवर जनजागृती करत नाल्यात सांडपाणी न सोडण्याचे आवाहन केले होते. शेवटी, 08 एप्रिल रोजी सकाळी १०:५० च्या सुमारास सिटी को-ऑर्डिनेटर जाधव यांनी फुटलेल्या पाइपमधून नाल्यात वाहणारे सांडपाणी प्रत्यक्ष पाहून त्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून मोबाईलमध्ये कैद केला... या संपूर्ण प्रकरणावरून नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांचे जागरूक नेतृत्व आणि कार्यतत्परता दिसून येते. संबंधित मालकाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रशासनाकडून कठोर कारवाई अटळ हे आता स्पष्ट असताना आज गुरुवारी दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 11:08 चा समायी पुन्हा जोरदार सांड पाणी नाल्यात वाहण्याचा प्रकार घडले... तर सदर व्हिडीओ काडून न.पं कार्यलीन अधिकारी यांना माहितीसाठी पाठविण्यात आला...
