महाराष्ट्र वेदभुमी

"माणगावमध्ये एकल वापर प्लास्टिकवर धडक कारवाई; १० हजार दंड, ६किलो प्लास्टिक जप्त"

माणगाव (प्रतिनिधी – नरेश पाटील) : "माझी वसुंधरा 5.0" आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024 च्या पार्श्वभूमीवर माणगाव नगरपंचायतने एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत शहरात जोरदार कारवाई केली. बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी शहरातील विविध दुकानांतून एकूण ६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित वितरक व दुकानदारांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिक व व्यापाऱ्यांना पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव, स्वच्छता निरीक्षक प्रमोद मोरे व नगरपंचायतचे कर्मचारी यांनी ही मोहीम राबवली.  दरम्यानाचा काळात सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव म्हणाले, “सिंगल युस प्लास्टिक केवळ पर्यावरणालाच नव्हे तर मानवी आरोग्यालाही धोका पोहोचवते. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने पुनर्वापरयोग्य पर्यायांचा स्वीकार करावा.”  ही मोहीम स्वच्छ भारत मिशनशी सुसंगत असून, नागरिकांचे सक्रीय सहकार्य हीच यशस्वीतेची गुरुकिल्ली असल्याचे मत वार्तालाप करताना सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post