सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- जनावरांना कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत चार जनावरांची सुटका केली. ही कारवाई रामटेक तालुक्यातील देवलापार मार्गावर रात्री चा सुमारास करण्यात आली. जबलपूर-नागपूर महामार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात दोघांना अटक करण्यात आली असून, कारमधील तीन जनावरांची सुटका केली तर एका मृत गुराची विल्हेवाट लावली. या कारवाईत एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मसूद साजीद कमाल (२०, रा. नवीन पोलिस ठाण्यासमोर, वॉर्ड क्रमांक-९, कामठी) व मोहम्मद असद मोहम्मद असलम (२६, रा. येरखेडा रोड, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाते आहेत शिवणी (मध्यप्रदेश) येथून देवलापार मार्गे नागपूरच्या कारमध्ये गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी देवलापार येथील पोलिस ठाण्यासमोर नाकाबंदी करीत एमएच ३१ डीसी २३१३ क्रमांकाची कार अडविली. झडतीदरम्यान त्या कारमध्ये तीन कालवडी आणि एक गाय अशी चार जनावरे कोंबली असल्याचे दिसले. यातील एका कालवडीचा गुदमरून मृत्यू झाला होता. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कारमधील दोघांना अटक केली. शिवाय तीन गुरांची सुटका करीत त्यांना नजीकच्या गोरक्षणमध्ये पाठविले, तर मृत कालवडीची पंचनामा करून विल्हेवाट लावली. या कारवाईमध्ये ३ लाख ५० हजार रुपयांची कार आणि ३० हजार रुपयांची जनावरे असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मरेमाल जप्त केला. सदर कारवाही देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद मरसकोल्हे, पोलीस अमलदार बंटी गेडाम, सचिन येलकर, मनीष चौकसे, सैनिक सोहेल पठाण खुशाल मंडलेकर यांच्या पथकाने केलेली आहे...
