महाराष्ट्र वेदभुमी

जिनिंग मिलमधील कापसाला भीषण आग ; ५० काेटींचे नुकसान

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी येथील आमडी फाट्याजवळील गिरीराज स्पीनींग मिलमध्ये रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याने मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागून मशीनरी व जेसीबी जळाल्या या आगीमुळे अंदाजे ५० कोटीचे नुकसान झालं आहे... या आगीवर पाण्याचा मारा सुरू करण्यात असून, कापूस असल्यानं आग धुसमत होती...

आमडी फाटा परिसरात असणाऱ्या गिरीराज जिनिंग कंपनीत मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होता. यादरम्यान रात्री ३ वाजताच्या सुमारास जेसीबी मशीनच्या माध्यमातून कापूस जमा करत असतांना अचानक आग लागली... आणि हळूहळू आग पसरत गेली... कामावरील कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना शक्य झाले नाही... यांची सूचना त्यांना पारशिवनी व रामटेक पोलिसांना दिली.... तात्काळ पारशिवनी व रामटेक पोलीस घटनास्थळी पोहचले. आग हळूहळू पसरत संपूर्ण परिसरात पसरली यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा जळून राख झाला... तर एक जेसीबी व काही मशीन जळाल्यात... तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात प्रामुख्याने नगरपरिषद रामटेक, खापा, सावनेर, कामठी, कन्हान पिपरी, एनटीपीसी मौदा, पारशिवनी अशा मी गेलो होतो तेव्हा ८ अग्निशमन होत्या आता अजून ४ आल्या आहेत. १२ अग्निशमन दल कार्यरत व आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरु केले मात्र आग इतकी भिषण होती कि वृत्त लिहीस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती... या घटनेत सुमारे ५० कोटी रुपयांच्या वर नुकसान झाल्याची माहिती जिनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली...

Post a Comment

Previous Post Next Post