जालिंदर शेवाळे यानी त्यांच्या वडील कै.शांताराम शंकर शेवाळे यांच्या स्मरणार्थ सुरु केली पाणपोई
अनंता म्हसकर -:धाटाव रोहा
श्री धावीर नगरी म्हाडा काॅलनी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कै.शांताराम शंकर शेवाळे यांच्या स्मरणार्थ श्री जालिंदर शांताराम शेवाळे यांच्या सौजन्याने माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते पाणपोई चे लोकार्पण सोहोळा संपन्न झाले...
रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील म्हाडा काॅलनी येथील रहिवासी प्रसिद्ध उद्योजक राम मंदिर अध्यक्ष व म्हाडा काॅलनी अध्यक्ष श्री जालिंदर शेवाळे यानी त्यांच्या वडील कै. शांताराम शंकर शेवाळे यांच्या स्मरणार्थ श्री धावीर नगरी म्हाडा काॅलनी येथे रोहा चणेरा रोडला उनाताना तुन ये जा करणारे लोकांची तहान भागविण्यासाठी आपले वडीलांचे स्मरणार्थ सुंदर पाणपोई तयार करून माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण सोहळा करण्यात आला या सोहळ्याच्या वेळी माजी आमदार अनिकेत भाई तटकरेंसह उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, समीर सकपाळ, राजु जैन, अमित उकडे, मोती सेठ जैन, परेश दामानी,कैलास जैन, अशोक लाड, निलेश शिर्के,माझ सवाल,गौरव सुर्वे,रविंद्र चाळके,आर्किटेक्ट राहुल जालिंदर शेवाळे आदींसह सर्व शेवाळे परिवार व म्हाडा काॅलनी येथील बहुसंख्य रहिवाशी बंधू भगिनी उपस्थित होत्या...
