महाराष्ट्र वेदभुमी

उन्हाळ्यात वन्यजीवांची मिटणार तृष्णा ; जंगलात कृत्रिम पाणलोट



कमी किमतीचे कृत्रिम एकूण ३४ पाणलोट

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- मार्च महिना संपल्याने वातावरणात उष्‍णता वाढी लागली आहे. यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगलातील वन्‍यप्राण्‍यांची पाण्यासाठी भटकंती होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाची लाहीलाही होऊ नये म्हणून येथील प्रादेशिक वन विभागाने कृत्रिम पाणलोट तयार केले आहेत...

सूर्य आता चांगलाच तळपायाला लागलाय. उन्हामुळे शहर, ग्रामीण आणि जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटायला लागलेत. पूर्व पेंच पिपरिया जंगलात भरपूर पाऊस होत असला तरी या भागात पाण्याचा मोठा दुष्काळ असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात वाघ, बिबट, अस्वल, सांबार, हरिण, नीलगाय, ससा, या वन्यप्राण्यांसह विविध पक्ष्यांच्या तृष्णांतृप्तीसाठी व्याघ्र प्रकल्पांतर्गत कृत्रिम पाणलोट तयार करण्यात आलेत...

पूर्व पेंच पिपरिया वन परिक्षेत्रातील अमलतास पर्यटन संकुल येथे कमी किमतीचे कृत्रिम एकूण ३४ पाणलोट बांधण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पूर्व पेंच रेंजच्या प्रत्येक भागात "श्रमदान" वापरून असा एक पाणलोट बांधला जाईल. श्रमदान ड्राइव्ह मिशनची सुरुवात श्री कृष्णा घोळवे, वनपाल (अतिरिक्त), अमलतास यांनी केली. ज्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. या पाणलोटांसाठी जागा काळजीपूर्वक निवडण्यात आली आहेत, ज्यामुळे ते झाडांच्या सावलीत राहतील याची खात्री केली जाते, ज्यामुळे उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी होऊन प्राणी आणि पक्ष्यांना विश्रांतीसाठी जागा मिळते. या आव्हानात्मक परिस्थितीत वन्यजीवांना अत्यंत आवश्यक असलेले जलस्रोत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे...

Post a Comment

Previous Post Next Post