पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर) : रोहा तालुक्यातील द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी येथील शिक्षण घेणारी कु. विश्वा गजेंद्र आटपाडकर ही जवाहर नवोदय विद्यालयामधील प्रवेश परीक्षा मोठया मेहनतीने उत्तीर्ण झाली... असुन तीचे या यशाबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे...
कु. विश्वा आटपाडकर हिने केलेली जिद्द व चिकाटी याच्या जोरावर मोठया मेहनतीने अभ्यास करून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन आई-वडिलांचे नाव रोशन केले... तीचे वडील गजेंद्र हे खाण कामगार असुन तीची आई प्रियांका गृहिणी आहे... तिच्या पालकांची इच्छा होती की आपल्या मुलीने जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घ्यावे अशी होती...हे वडिलांचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे... कु.विश्वा हिच्या यशा बद्दल द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचे मुख्यध्यापक. एस जी. काळे सर, .एस.पी. मोटे, एस.पी.शिंदे,एस. व्ही. मरवडे, डी. व्ही. पोटफोडे, व्ही. बी. कालेकर, आर. आर. डोंगरदिवे, पी. पी दळवी, सी.सी वरखले, एन. एन काफरे, व्ही.जे.शेळके, कु.एस आर जांभळे तसेच कर्मचारी वृंद तसेच सुतारवाडी परिसरातील असंख्य नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...