महाराष्ट्र वेदभुमी

शहर सीमेवर जावुन सर्वेक्षणाला सुरुवात

 


ग्रा.पं. प्रशाषणाने गेल्या कित्येक वर्षांमध्ये नागरीकांकडून केला करोडोंचा कर वसुल

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- स्थानिक नगरपालिका हद्दीमध्ये येत असलेले रहिवासी नागरीक तथा व्यावसायीकांकडून न.प. प्रशासनातर्फे कर 'आकारणी करणे अपेक्षीत असतानाही मात्र रामटेक न.प. हद्दीमध्ये आजुबाजुच्या काही ग्रामपंचायतींनी हस्तक्षेप करून नगर परिषद हद्दीतील रहिवासी नागरिक तथा व्यावसायीकांकडून गेल्या कित्येक वर्षांमध्ये करोडो रुपयांची कर वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच माजी नगरसेवक धोपटे यांच्या पुढाकारातून उघडकीस आला आहे.. तेव्हा धोपटेंसह स्थानिक पत्रकारांनी सदर मुद्दा उचलुन धरताच नगरपरिषदेचे प्रशाषक असलेले एसडीओ प्रियेश महाजन यांचे मार्गदर्शनात नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी त्वरित दखल घेत कार्यवाही सुरू केलेली आहे.. त्यानुसार आज दि. २५ मार्चला नगरपरिषदेच्या नगररचना सहाय्यक देवश्री उईके यांनी शहर सीमेवर जावुन सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे. नगरपरिषद हद्दी मधून ग्रामपंचायतींचा हस्तक्षेप काढण्याबाबद माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी प्रशासक असलेले एसडीओ प्रियेश महाजन यांचे सह नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांना मागणी केलेली होती मात्र आठ दिवसांच्या वर कालावधी लोटूनही कोणतीही कारवाई प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून न झाल्याने शेवटी हताश होऊन त्यांनी ' ग्रामपंचायतींच्या तावडीतून नगरपरिषदेचा भाग सोडवा अन्यथा मी जनहित याचिका दाखल करणार 'असा इशारा दिला होता... मात्र शिस्तबद्ध कार्यप्रणालीने प्रशासन चालविणाऱ्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ही वेळ येऊ दिलेली नाही व त्यांनी वेळीच या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही सुरू केलेली आहे. नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या उत्तरेकडील एका मोठ्या भागावर लगतच्या सोनेघाट ग्रामपंचायत प्रशाषणाने अतिक्रमण केल्यागत तेथील रहिवाशांकडून कर आकारणी करून आजपावेतो कोटींचा निधी उकळलेला असल्याचे माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी बोलताना सांगितले... तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने सुद्धा आता प्रारंभी त्याच भागाकडून सर्वेक्षणाला सुरुवात केलेली असून लवकरच उचित कार्यवाही करण्यात येणार आहे... नगररचना सहाय्यक देवश्री उईके यांनी आज सर्वेक्षणाला सुरुवात केलेली असून याबाबतचा संपूर्ण अहवाल त्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचे सुपूर्द करणार आहे त्यानंतर शिस्तीने प्रशासन चालविणाऱ्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत या पुढील कार्यवाही करणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post