महाराष्ट्र वेदभुमी

किहीम ग्रामपंचायतीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते टिबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार,


किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचे कौतुक

सोगाव - अब्दुल सोगावकर : दरवर्षी दि.२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या क्षयरोग (टिबी) दिनाच्या निमित्ताने सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून क्षयरोगाच्या बाबतीत ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती, त्यामुळे त्यांनी किहीम ग्रामपंचायत क्षयरोग (टिबी) मुक्त ग्रामपंचायत होण्याचा मान मिळविला आहे. याबद्दल जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या हस्ते रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या भव्य कार्यक्रमात किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना 'क्षयरोग(टिबी)मुक्त ग्रामपंचायत' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...

        हा पुरस्कार किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी ग्रामपंचायत कर्मचारी श्री. भिसे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी तसेच चोंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सतीश पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यासोबतच रायगड जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, आरोग्य अधिकारी, आशा सेविका, आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन : 'क्षयरोग(टिबी)मुक्त ग्रामपंचायत' हा पुरस्कार स्वीकारताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post